काटोल: अवैध देशी दारू वाहतूक करणारा जेरबंद; ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Jun 11, 2026 अवैधपणे देशी दारूची वाहतूक करणाऱ्या योगेश रमेश वरूडकर (वय ३२, रा. शनिचरापेठ, कोंढाळी) याला कोंढाळी पोलिसांनी अटक केली आहे. १० जून २०२६ रोजी पोलिसांनी बहिरामबाबा देवस्थान, काटोल रोड येथे नाकाबंदी दरम्यान त्याच्याकडील इलेक्ट्रिक बाईकची (क्र. MH 40/DH 9533) तपासणी केली. यावेळी ५० देशी दारूचे निप सापडले.