काटोल: काटोल-जलालखेडा मार्गावरील खड्डे ८ दिवसांत बुजवा; आमदार चरणसिंग ठाकूर यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम
Katol, Nagpur | Apr 11, 2026 काटोल ते वरूड मार्गावरील जलालखेडा पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था लक्षात घेता, माजी आमदार चरणसिंगजी ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मार्गावरील खड्डे त्वरित दुरुस्त करण्यासाठी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली व प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी केली. येत्या आठ दिवसांच्या आत रस्त्याची दुरुस्ती करण्याचे कडक निर्देश त्यांनी यावेळी दिले