महाड: महाड शहरात पाणीटंचाईचे संकट गडद
Mahad, Raigad | Apr 27, 2026 महाड शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे आणि कुर्ला धरणातील पाणीसाठा लक्षणीयरीत्या कमी झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी अनेक भागांत पाणीपुरवठा अनियमित झाला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या शहरातील अनेक परिसरांमध्ये एक दिवसाआड दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे.