महाड: राजगड ते रायगड रस्त्याचे काम रखडले
Mahad, Raigad | May 22, 2026 कोकण आणि पुणे यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून पुणे जिल्ह्यातील राजगड (वेल्हे) ते रायगड (महाड) या 18 किलोमीटर लांबीच्या नवीन रस्त्याला शासनाची प्रशासकीय मंजुरी आणि पहिल्या टप्प्यात 25 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मिळूनही गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले आहे. राजगड (वेल्हे) ते रायगड (महाड) हा रस्ता पूर्ण झाल्यास पुणे ते रायगड आणि अर्थातच कोकणात पोहोचण्यातील अंतर आणि वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.