पाणी वाचवा, भविष्य वाचवा! लोढा एलाइट सोसायटीचा पर्जन्यजल संचयन उपक्रम ,पर्यावरण संवर्धनासह जलसाक्षरतेचा संदेश
"पाणी हेच जीवन" आणि "पाणी वाचवा, भविष्य वाचवा" या घोषवाक्यांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आला उपक्रम
कल्याण : वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील जलसंकटाची तीव्रता लक्षात घेऊन निळजे येथील लोढा एलाइट सीएचएस लिमिटेडच्या व्यवस्थापन समितीने पर्जन्यजल संचयन व भूजल पुनर्भरण (Rainwater Harvesting and Groundwater Recharge) हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. पर्यावरण संवर्धनासह जलसाक्षरतेचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सोसायटीतील सहा वर्षांवरील मुलांचा सक्रिय सहभाग. भविष्यातील जबाबदार नागरिक आणि नेतृत्व घडविण्याच्या उद्देशाने मुलांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पावसाचे पाणी कशाप्रकारे साठवले जाते, त्याचे गाळण (फिल्ट्रेशन) कसे केले जाते आणि त्याचा भूजल पुनर्भरणासाठी कसा उ�
Kalyan, Thane | Jun 22, 2026