महाड: रायगडात पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा
Mahad, Raigad | Jul 1, 2026 भारतीय हवामान विभागाने कोकणातील रायगडसह पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील पाच दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात २९ जून ते ३ जुलैदरम्यान बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या कालावधीत पावसाची शक्यता 'अत्यंत संभव' असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.