खान्देशच्या इतिहासातील सुवर्ण पाने : भाग ५
या जगप्रसिध्द कलाकाराने चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर ४८ वर्ष पाहिली प्रेयसीची वाट!
पिकासो, लिओनार्डो द विंची, क्लॉड मोनेट... जागतिक कलाकारांच्या यादीत एक नाव आपल्या जळगाव जिल्ह्यातलंही आहे, असं सांगितलं तर विश्वास बसेल का? चाळीसगावात राहून केकी मूस जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरले.
१९१२ मध्ये मुंबईच्या मलबार हिलमध्ये पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९३५ मध्ये त्यांनी इंग्लंडच्या 'द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड'मध्ये प्रवेश घेतला आणि चार वर्षांत कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. डिसेंबर १९३९ मध्ये भारतात परतल्यावर ते चाळीसगावच्या बंगल्यात आले आणि तब्बल पन्नास वर्षे त्यांनी स्वतःला आत्मकैद करून अखंड कलासाधना केली.
असं म्हटलं जातं की सलग ४८ वर्षे ते प्रेयसीची वाट पाहत होते. रोज रात्री पंजाब मेलच्या वेळी ते गेटवर येऊन थांबायचे. ती कोण होती, याचं उत्तर आ