मुरुड: पावसाच्या आगमनाने पर्यटन रोडावले
Murud, Raigad | Jun 23, 2026 कोकणात पावसाळ्याचे आगमन होताच अलिबाग, रेवदंडा, नागाव, काशिद आणि मुरूड येथील समुद्रकिनाऱ्यांवरील पर्यटकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये हजारो पर्यटक आणि चाकरमानींनी गजबजलेल्या या पर्यटनस्थळांवर सध्या शांतता पसरली असून पर्यटनावर आधारित व्यवसायांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. विशेषतः रेवदंडा समुद्रकिनारा, नागाव, काशिद आणि मुरूड येथील बीच परिसरात पर्यटकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.