देहूरोड हादरले! एकाच रात्रीत ३ दुकाने साफ; चोरट्यांचा थरार CCTV मध्ये कैद पहा !
देहूरोड परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तब्बल तीन दुकानांचे कुलूप तोडून धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत लाखो रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची माहिती असून दुकानांतील साहित्यही अस्ताव्यस्त करण्यात आले आहे. बाजारपेठेतील जगन्नाथ खंडेलवाल यांचे घाऊक किराणा दुकान, देहूरोड रेल्वे स्थानकाजवळील ओम मेडिकल आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील बालाजी ट्रेडिंग या दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केले.
घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे दिसून आले असून त्यांनी मोठ्या शिताफीने चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपास वेगाने सुरू असून व्यापारी वर्गाने रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केल
#cctv #update #dehu #news #robbery
Haveli, Pune | Jun 14, 2026