श्रीगोंद्यात हायव्होल्टेज ड्रामा! ३ पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं; नागरिकांनी पोलीस स्टेशनबाहेरच फोडले फटाके...
.
.
श्रीगोंदा (अहमदनगर):
अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारणाऱ्या श्रीगोंदा पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी रंगेहात कारवाई केली.
दादा म्हस्के आणि नितीन गाडगे या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले असून, राजेश जाधव नावाच्या अन्य एका कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. या धडक कारवाईमुळे श्रीगोंदा तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात आणि पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. 'लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे,' असे आवाहन ACB कडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
.
.
.
#Shrigonda #ShrigondaPolice #ACB #ACBCorruption #AhmednagarNews #MaharashtraPolice #BreakingNews #CrimeNews #AntiCorruption #अहमदनगर #श्रीगोंदा #लाचलुचपतप्रतिबंधकविभाग
Haveli, Pune | Jun 19, 2026