17 कोटींचं लग्न ठरलं! वाढदिवसाचा आनंद क्षणात विरला, होणाऱ्या पत्नीचा बर्थडे साजरा करायला लोहगडवर गेला; फोटो काढताना पाय घसरला अन् २४ वर्षीय तरुणाचा दरीत कोसळून अंत...
पुण्यातील ट्रेकर्सचे आवडते ठिकाण असलेल्या लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गडावर गेलेल्या एका 24 वर्षीय तरुणाचा फोटो काढताना पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. केतन विशाल अग्रवाल (वय 24) असे या मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी (18 जून) सकाळी घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी वाढदिवस (Birthday) होता. हा दिवस खास करण्यासाठी त्या दोघांनी सकाळीच लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी (Trekking) जाण्याचा बेत आखला होता. दोघेही सकाळी लवकर गडावर पोहोचले. किल्ल्यावर भटकंती सुरू असताना आनंदाचे हे क्षण मोबाईल कॅमेऱ्यात टिपले जात होते. किल्ल्यावरील दरीच्या बाजूला उभे राहून केतन एका फोटोसाठी पोज देत होता. मात्र, गडावरील पृष्ठभाग निसरडा झाला होता. फोटो काढत असतानाच अचानक निसरड्या जागेवरून केतनचा पाय घसरला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.
.
.
.
#LohagadFort #PuneNews #Lonavala #TrekkingAccident #SafetyFirst #TrekkingAccident
#SafetyFirst #LohagadAccident #TrekkersAlert #KetanAgarwal
Haveli, Pune | Jun 19, 2026