पुणे मार्केट यार्डमध्ये देवगड हापूसची पहिली आवक! पाच डझनांच्या क्रेटला तब्बल २० हजार रुपये
पुणेकरांची देवगड हापूस आंब्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या हंगामातील देवगड अल्फोन्सो आंब्यांची पहिली खेप ११ नोव्हेंबर रोजी पुणे मार्केट यार्डमध्ये दाखल झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील शेतकरी ओमप्रकाश घाडी यांच्या बागेतील आंब्यांना पहिल्याच व्यवहारात चांगला भाव मिळाला.
व्यापारी युवराज काची यांनी पाच डझन आंब्यांची एक क्रेट तब्बल २० हजार रुपयांना खरेदी केली. तर १४ आंब्यांचा दुसरा लॉट २,१०० रुपयांना विकला गेला. येत्या काही आठवड्यांत आवक वाढण्याची आणि शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळण्याची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे.
#DevगadHapus #AlphonsoMango #PuneMarketYard #MangoSeason #Sindhudurg #PuneNews #देवगडहापूस #हापूसआंबा #पुणे
Pune City, Pune | Nov 12, 2026