लखनऊमध्ये गुटखा कारखान्याला भीषण आग; लाखों रुपयांचा माल जळून खाक, जीवितहानी टळली!
लखनऊ (उत्तर प्रदेश) : लखनऊमधील दुबग्गा कोतवाली क्षेत्रातील यादव बाजार येथे गुटखा कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत कारखान्यातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
घटनेची माहिती मिळताच दुबग्गा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
#Lucknow #FactoryFire #UttarPradesh #FireIncident #BreakingNews
Pune City, Pune | Nov 12, 2026