जुन्या वादातून घरावर हल्ला अन् कारला आग; आगीत ७ वाहनांचे नुकसान, CCTV व्हिडिओ समोर!
राजकोट (गुजरात) : राजकोटमधील रायया गावात जुन्या वैमनस्यातून दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन अज्ञात हल्लेखोरांनी एका घराच्या खिडक्या आणि दरवाजांच्या काचा फोडण्यासाठी सोड्याच्या बाटल्या फेकल्या. त्यानंतर तक्रारदाराच्या कारला आग लावल्याचा आरोप आहे.
आग इतकी भीषण होती की शेजारी उभ्या असलेल्या आणखी दोन कार आणि एका दुचाकीसह एकूण सात वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर युनिव्हर्सिटी पोलीस ठाण्यात शेजारी राहणाऱ्या एका महिलेसह अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
#Rajkot #GujaratNews #CCTVFootage #ArsonAttack #CrimeNews
Pune City, Pune | Nov 12, 2026