कर्तव्यदक्षता, नियोजन आणि समन्वयातून बंदोबस्त यशस्वी! 🚔
दिनांक ०५ नोव्हेंबर २०२६ रोजी यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान आयोजित 'लोकशाही वाचवा – अराजकता हटवा' पदयात्रेच्या अनुषंगाने नागपूर शहर पोलीस दलाच्या वतीने व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या पदयात्रेत मान्यवर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी तसेच सुमारे ९,५०० ते १०,००० नागरिक सहभागी झाले होते.
पदयात्रेचा मार्ग, गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था आणि विविध ठिकाणांवरील पोलीस तैनाती यांचे योग्य नियोजन व समन्वय साधण्यात आला.
नागपूर शहर पोलीस दलाच्या अधिकारी व अंमलदारांनी अत्यंत सतर्कतेने आणि दक्षतेने आपली कर्तव्ये पार पाडली. परिणामी, संपूर्ण पदयात्रा शांततेत व सुरळीतपणे पार पडली.
नागरिकांची सुरक्षा आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, हेच नागपूर शहर पोलीस दलाचे सर्वोच्च प्राधान्य!
#NagpurPolice #Bandobast #TrafficManagement #PublicSafety #NagpurCityPolice #DutyWithPride
120 views | Nagpur, Maharashtra | Nov 6, 2026