काटोल: वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे नागपूर ग्रामीण पोलिसांची खबरदारी; पोलीस अधीक्षकांकडून विशेष सूचना
Katol, Nagpur | Apr 15, 2026 उन्हाचा तडाखा वाढत असल्याने, कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या आरोग्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी विशेष पावले उचलली आहेत. सर्व पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांसाठी 'वॉटर डिस्पेंसर'ची सोय करण्यात आली आहे.उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पोलिसांना केळी आणि इलेक्ट्रोल्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.