महाड: महाड शहरातील 'तिसरा डोळा'च झालाय बंद
Mahad, Raigad | May 7, 2026 महाड शहरात एकाच दिवशी घडलेल्या तीन धाडसी दुकानफोडींच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाला अखेर कठोर भूमिका घ्यावी लागली आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी वेगवेगळ्या भागांतील दुकानांचे शटर फोडून चोरीचा केलेला प्रयत्नाने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा नव्याने बसवण्याचे काम नगरपालिकेपर्यंत सहा महिने पूर्वीच मंजूर करण्यात आले होते.