नागपूर शहर: पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाचा मोठा दणका: सक्करदरा परिसरात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या पानटपरीवर धाड
शहर पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट पथकाने रात्रीच्या गस्तीदरम्यान सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या पानटपरीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बंदी घातलेला पान मसाला, गुटखा, हुक्का फ्लेवर आणि रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.मध्यरात्री ३:०० वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्तांचे एस्कॉर्ट पथक गस्तीवर असताना, सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा ताजबाग परिसरात 'KGN पानशॉप' उघडे असल्याचे दिसून आले.