रामटेक: कांद्री माईन्स रेल्वे क्रॉसिंग व कांद्री मॉयल कडे जाणाऱ्या चौरस्त्यावर ओव्हरबीज बनविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Ramtek, Nagpur | Mar 15, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर समोरील कांद्री माईन्स रेल्वे क्रॉसिंग चौरस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी या ठिकाणी ओव्हर ब्रिज बनवण्याची मागणी कांद्री ग्रामपंचायतचे माजी सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा चे जिल्हा उपाध्यक्ष रवी कठोते व जिल्हा कार्याध्यक्ष नितीन कराडे यांनी रविवार दिनांक पंधरा मार्चला ओरिएंटल टोल प्लाजा हायवे चे व्यवस्थापकाकडे निवेदन देऊन केली आहे.