महाड: महाडमधील 30 इमारती धोकादायक म्हणून घोषित
Mahad, Raigad | Apr 16, 2026 महाड शहरात सध्या धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला असून तब्बल 30 इमारती प्रशासनाने धोकादायक म्हणून घोषित केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे मानण्यात येत आहे. सात-आठ वर्षांपूर्वी महाड शहराच्या मोहल्ल्यामध्ये तारीक इमारतीच्या दुर्घटनेत काही जणांना आपले प्राण गमवावे लागले होते त्या पश्चात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व इमारती शासकीय इमारती रस्त्यावरील पूल या सर्वांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून प्रतिवर्षी त्याची तपासणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते.