काटोल: कोंढाली जवळ वाघाची दहशत; शिरमी शिवारात दोन वासरांचा फडशा
Katol, Nagpur | May 13, 2026 कोंढाली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिरमी शिवार परिसरात सध्या वाघाच्या वावरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. एका वाघाने चक्क गोठ्यात शिरून दोन वासरांची शिकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.शिरमी येथील पीडित शेतकरी **युवराज वैरागडे** हे नेहमीप्रमाणे रात्री आपल्या गुरांना चारा-पाणी करून घरी गेले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या गोठ्यावर हल्ला चढवला.