*बिग बॉस फेम दिव्या शिंदेंनी खुनाचा प्रयत्न आणि खंडणीचे आरोप फेटाळले; डॉक्टर गायकवाड यांच्यावरच गंभीर आरोप!*
बिग बॉस फेम दिव्या शिंदे यांनी खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसारखे गंभीर आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर विद्याधर गायकवाड यांनी दिव्या शिंदे यांच्यावर आरोप केले होते. मात्र, आता दिव्या शिंदे यांनी हे आरोप नाकारत डॉक्टर विद्याधर गायकवाड यांनीच आपल्याला मारहाण केल्याचा दावा केला आहे.
तसेच काळेपडळ पोलिसांनी आपली विनयभंगाची तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणात डॉक्टर विद्याधर गायकवाड यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी दिव्या शिंदे यांनी केली आहे. दोन्ही बाजूंकडून करण्यात आलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले असून, या प्रकरणातील सत्य तपासातून स्पष्ट होणार आहे.
Divya Shinde News, Bigg Boss Fame Divya Shinde, Dr Vidyadhar Gaikwad, Divya Shinde Allegations, Extortion Allegations, Attempt to Murder Case, Kalepadal Police, Pune Crime News, Divya Shinde Controversy, Maharashtra Crime News, दिव्या श�
Pune City, Pune | Nov 16, 2026