नागपूर शहर: कळमन्यात महिला घरीच चालवत होती देहव्यापार,अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची सुटका
19 ऑगस्टला दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील कळमना पोलीस ठाण्यांतर्गत भगत नगर, भरतवाडा रोड येथे देह व्यापाराच्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला.पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन महिलांची देह व्यापारातून सुटका केली. ३६ वर्षीय महिला संचालिका, लक्ष्मी किशोर कुरे हिला घटनास्थळावरून अटक करण्यात आली.सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली असून, आरोपी महिलांविरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.