महाड: खाडीपट्टयात विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
Mahad, Raigad | May 16, 2026 महाड तालुक्यातील खाडीपट्टयाच्या परिसरातील ग्रामीण कुंभळे विभागात विजेच्या लपंडावाने नागरिक पुरते त्रस्त झाले असून वाढलेल्या तापमानाने आणखी त्रासदायक ठरत आहे. महावितरण कंपनीकडून अत्यंत अनियमितपणे वीज गायब होत आहे. त्याचा प्रचंड त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. महावितरण कंपनीचे एका महिन्याचे जरी वीज बील भरले नसले, तरी कारवाई होते. मात्र दरदिवशी वारंवार गायब होणाऱ्या वीजेमूळे होणाऱ्या नागरिकांच्या त्रासाचे काय ? असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.