कामठी: कामठीत पोलिसांची मोठी कारवाई: ३ ग्रॅम 'एमडी' ड्रग्जसह आरोपीला अटक
Kamptee, Nagpur | May 14, 2026 पोलीस ठाणे नवीन कामठी अंतर्गत 'ऑपरेशन थंडर' राबवत असताना पोलिसांना अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एरखेडा परिसरात सापळा रचून पोलिसांनी एमडी ची तस्करी करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतले आहे आरोपींकडून एमडी देखील जप्त करण्यात आली आहे. बद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंधळे यांनी दिली आहे