नागपूर शहर: कुकडीखापा वॉटरफॉलमध्ये अडकलेल्या नागपूरच्या चार तरुणांची सुरक्षित सुटका; एसडीआरएफ आणि प्रशासनाची मोठी कारवाई!
छिंदवाडा जिल्ह्यातील मोहखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुकडीखापा गावाजवळील वॉटरफॉल परिसरात रविवारी नागपूरचे चार तरुण फिरण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा वाट चुकल्याने हे सर्व तरुण सुमारे १५० फूट खोल भागातील अशा ठिकाणी अडकले, तिथून बाहेर पडणे त्यांना अशक्य झाले होते.या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्रशासकीय पथक आणि एसडीआरएफ ची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.