मुरुड: उन्हाळी सुट्टीत काशीद, मुरूड बीच पर्यटकांनी फुलले
Murud, Raigad | May 9, 2026 मे महिन्याच्या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी मुरूड तालुक्यातील काशीद, मुरूड बीचवर पर्यटकांची मोठी मांदियाळी झाल्याचे दिसत आहे. अतिशय गरमा वाढलाअसल्यामुळेवातानुकूलित रूम घेऊन समुद्राच्या थंडगार लाटांमध्ये कूल होण्यासाठी हजारो पर्यटक मुरुडकडे आलेत, दुसरे कारण म्हणजे मुरुडची ताजी मासळी व सुकी मासळी खरेदी करण्यासाठी मुंबई-पुणे व महाराष्ट्रातून पर्यटक मुरुडला येतात, मुरुड सारखी ताजी व सुकी मासळी पूर्ण कोकणात मिळत नाही.