महाड: रायगड जिल्ह्यात पावसाची संथ सुरुवात
Mahad, Raigad | Jun 12, 2026 रायगड जिल्ह्यात यंदा पावसाची सुरुवात अत्यंत संथ झाली आहे. १० जून पर्यंतच्या पर्जन्य नोंदीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ ८.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण एकूण सरासरीच्या (२१८.६ मिमी) तुलनेत अवघे ३.८ टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी सन २०२५ मध्ये याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल ७४.२ मिमी (३३.९ टक्के) पाऊस झाला होता, त्याच्या तुलनेत यंदा पावसाचा जोर अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे.