काटोल: काटोलमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ आरोपी अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | May 21, 2026 काटोल पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पंचवटी परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर प्रत्यक्ष धाड टाकली. यावेळी ५२ पत्त्यांवर पैशांचा डाव लावून जुगार खेळणाऱ्या १३ आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.