रस्ता नव्हता, पण माणुसकी होती..! आजारी विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन ३ किमी चालल्या वॉर्डन; धाडसी व्हिडिओ व्हायरल...
आंध्र प्रदेशातील पर्वतीपुरम मन्यम जिल्ह्यातील एका महिला वॉर्डनने मानवतेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. मुसळधार पाऊस, जंगलातील खडकाळ वाट आणि कोणतीही वाहतूक सुविधा नसतानाही त्यांनी गंभीर आजारी ११ वर्षीय विद्यार्थिनीला पाठीवर घेऊन तब्बल तीन किलोमीटर पायी चालत रुग्णालयात पोहोचवले.
वेळेत उपचार मिळाल्यामुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. या धाडसी आणि सेवाभावी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, देशभरातून महिला वॉर्डनच्या कर्तव्यनिष्ठेचे आणि माणुसकीचे कौतुक होत आहे.
व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क
#Humanity #Inspiration #AndhraPradesh #ViralVideo #Education #TribalArea #Healthcare #Hero #LatestNews