लोटे एम.आय.डी.सी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने एम.आय.डी.सी मधील अधिकारी व कर्मचारी, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक, वाहतूक व्यवस्था, वाहतूक कोंडी तसेच कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थितांच्या अडचणी जाणून घेत त्यावर आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही तसेच कामगार व नागरिकांचा प्रवास सुरळीत व सुरक्षित राहील, यासाठी संबंधित सर्वांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी,खेड श्री. शैलेश सणस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे , खेड पोलीस निरीक्षक श्री. विवेक अहिरे , तसेच विविध वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आणि एमआयडीसीमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range #ganeshutsav2026 #awareness #roadsafety #ratnagiripolice
9 views | Ratnagiri, Maharashtra | Sep 12, 2026