काटोल: हृदयद्रावक! विटांनी भरलेला ट्रक उलटून भीषण अपघात; ३ मजुरांचा मृत्यू, ३ गंभीर
Katol, Nagpur | May 20, 2026 चालकाच्या निष्काळजीपणामुळे विटांनी भरलेला आयशर ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात मोवाड येथील ३ मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी दरम्यान काटोलजवळील इसापूर (झिल्पा) गावाजवळ घडला.खापा येथून सावनेरमार्गे मोवाडकडे विटा घेऊन जाणारा आयशर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून घसरून थेट उलटला.