वर्धा: क्षयरोग निर्देशांकात वर्धा जिल्हा राज्यात दुसरा क्रमांकावर
Wardha, Wardha | Jan 23, 2026 राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या निर्देशांकात अतिजोखिमेच्या लोकांची तपासणी करण्याच्या कामात राज्यातून वर्धा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. क्षयरोग उपक्रमात जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत केलेल्या कामाच्या मुल्यांकनावर आधारित हा निकाल जाहिर करण्यात आला आहे.