वर्धा: ‘लाडकी बहीण’ योजनेची निकषांनुसार फेरतपासणी सुरू:जिल्हाधिकाऱ्यांना सचिवांचे पत्र:पात्र महिलांना दुरुस्तीची संधी
Wardha, Wardha | Jan 23, 2026 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान चुकीचे पर्याय निवडल्यामुळे अनेक महिलांचा लाभ तात्पुरता बंद झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी ग्रामस्तरावर अशा अर्जांची फेरतपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनीही पात्रता व अपात्रता निकषांच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे लाभ बंद झालेल्या सर्व महिलांची सखोल तपासणी केली जाणार आहे.