नागपूर शहर: शस्त्रासोबत नाचताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात, यशोधरा नगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोशल मीडियावर धारदार शस्त्रे हातात घेऊन दहशत पसरवणाऱ्या आणि त्याचे रील बनवून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांच्या टोळीवर नागपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.यशोधरानगर पोलिसांनी 'ऑपरेशन गरुडदृष्टी' अंतर्गत ही कारवाई करत गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले आहेत. आरोपींनी सोशल मीडियावर उघडपणे शस्त्रांसह व्हिडिओ बनवून कायद्याची भीती नसल्याचे दाखवले होते आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.