महाड: दासगावकरांचा नौकाविहार गाळात अडकला
Mahad, Raigad | Apr 7, 2026 महाड तालुक्याच्या पश्चिम दिशेकडील प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बंदर म्हणून विकसित असलेल्या व परिसरातील टेहळणी करण्याच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेल्या दौलत गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या दासगावमधील ग्रामस्थांचा व पर्यटकांचा नौका विहार या संगम पात्रामध्ये निर्माण झालेल्या गाळामुळे अडकला आहे. आगामी काळात तातडीने येथील गाळ उपसा काढला नगेल्यास नागरिकांनासमस्येला सामोरे जावे लागणार आहे.