Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Nsui
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh

हवेली: चिखली येथील बर्ड व्हॅलीमध्ये आग लागल्याची घटना घडली

Haveli, Pune | Nov 21, 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली येथील बर्ड व्हॅली या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली यावेळी अग्निशामन विभागाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामनदालाने ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

MORE NEWS

लातूरमध्ये - अवैध दारू विरोधात महिलांचा एल्गार, धाब्याची तोडफोड करत लावली आग

लातूर जिल्ह्यातील शिवपूर गावात कथित अवैध दारूविक्रीच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत एका धाब्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी धाब्याकडे मोर्चा वळवला. त्यानंतर धाब्याला आग लावण्यात आल्याच े सांगितले जात आहे.

घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अवैध दारूविक्रीच्या आरोपांसह आगजनीच्या घटनेचाही तपास सुरू असून, संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे

#लातूर #latur #shivpur #publicpower #news

लातूरमध्ये - अवैध दारू विरोधात महिलांचा एल्गार, धाब्याची तोडफोड करत लावली आग लातूर जिल्ह्यातील शिवपूर गावात कथित अवैध दारूविक्रीच्या विरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत एका धाब्याला आग लावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध दारूविक्रीबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी धाब्याकडे मोर्चा वळवला. त्यानंतर धाब्याला आग लावण्यात आल्याच े सांगितले जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. अवैध दारूविक्रीच्या आरोपांसह आगजनीच्या घटनेचाही तपास सुरू असून, संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे #लातूर #latur #shivpur #publicpower #news

Haveli, Pune | Jun 27, 2026

"‘४० लाख दिले साहेब...’ आमदार राजेश क्षीरसागरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?"
.
.
कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार करण्याची मोठी संधी मिळाली आहे.

या व्हायरल ऑडिओमध्ये "साहेबांचे पाच... पाचचा हिशोब ठरलेला. चाळीस लाख मी तुम्हाला दिले साहेब.. मालक तुम्ही," असे खळबळजनक संभाषण ऐकायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुख्यमंत्री आणि गृहविभागाकडे लागले आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करणार की नेहमीप्रमाणे 'क्लीनचीट' मिळणार, असा संतप्त सवाल नेटकरी आणि विरोधक उपस्थित करत आहेत.

टीप: व्हायरल ऑडिओ व्हिडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी अधिकृतपणे झालेली नसून, हा तपास यंत्रणांचा विषय आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा पडद्यामागचा खरा राजकीय खेळ काय आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
.
.
.
#RajeshKshirsagar #KolhapurPolitics #ViralAudio #MaharashtraPolitics #CMOMaharashtra #EknathShinde #KolhapurNews #BreakingNews #MaharashtraElection #PoliticalRumble #राजेशक्षीरसागर #कोल्हापूर #व्हायरलऑडिओ #महाराष्ट्रराजकारण

"‘४० लाख दिले साहेब...’ आमदार राजेश क्षीरसागरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?" . . कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कोल्हापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार करण्याची मोठी संधी मिळाली आहे. या व्हायरल ऑडिओमध्ये "साहेबांचे पाच... पाचचा हिशोब ठरलेला. चाळीस लाख मी तुम्हाला दिले साहेब.. मालक तुम्ही," असे खळबळजनक संभाषण ऐकायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. या ऑडिओ क्लिपमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुख्यमंत्री आणि गृहविभागाकडे लागले आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करणार की नेहमीप्रमाणे 'क्लीनचीट' मिळणार, असा संतप्त सवाल नेटकरी आणि विरोधक उपस्थित करत आहेत. टीप: व्हायरल ऑडिओ व्हिडिओ क्लिपच्या सत्यतेची पुष्टी अधिकृतपणे झालेली नसून, हा तपास यंत्रणांचा विषय आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पडद्यामागचा खरा राजकीय खेळ काय आहे? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. . . . #RajeshKshirsagar #KolhapurPolitics #ViralAudio #MaharashtraPolitics #CMOMaharashtra #EknathShinde #KolhapurNews #BreakingNews #MaharashtraElection #PoliticalRumble #राजेशक्षीरसागर #कोल्हापूर #व्हायरलऑडिओ #महाराष्ट्रराजकारण

Haveli, Pune | Jun 27, 2026

बसमध्ये जागा पकडण्याची घाई ठरली जीवघेणी; धावत्या बसखाली सापडून प्रवाशाचा मृत्यू...
.
.
अंबाजोगाई (बीड): एसटी बसमध्ये आधी जागा मिळवण्याच्या आणि सीट पकडण्याच्या घाईत एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत वेदनादायक घटना अंबाजोगाई बस स्थानकात घडली आहे. दुपारी भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस स्थानकात फलाटावर (प्लॅटफॉर्मवर) येत असलेल्या एका धावत्या बसमध्ये आधी चढण्यासाठी आणि जागा पकडण्यासाठी हा प्रवासी गाडीसोबत धावत होता. मात्र, याच घाईगडबडीत अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट बसच्या मागच्या चाकाखाली आला. चाकाखाली चिरडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपस्थित नागरिकांनी आणि एसटी प्रशासनाने त्याला तातडीने स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवाशांनी धावत्या बसमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
.
.
.
#Ambajogai #AmbajogaiNews #STBusAccident #BeedNews #MSRTC #BusStandAccident #AccidentNews #MaharashtraNews #AlertNews #SocialAwareness #STBus #अंबाजोगाई #बीड #एसटीबस #अपघात #मराठीबातम्या

बसमध्ये जागा पकडण्याची घाई ठरली जीवघेणी; धावत्या बसखाली सापडून प्रवाशाचा मृत्यू... . . अंबाजोगाई (बीड): एसटी बसमध्ये आधी जागा मिळवण्याच्या आणि सीट पकडण्याच्या घाईत एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागल्याची अत्यंत वेदनादायक घटना अंबाजोगाई बस स्थानकात घडली आहे. दुपारी भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस स्थानकात फलाटावर (प्लॅटफॉर्मवर) येत असलेल्या एका धावत्या बसमध्ये आधी चढण्यासाठी आणि जागा पकडण्यासाठी हा प्रवासी गाडीसोबत धावत होता. मात्र, याच घाईगडबडीत अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट बसच्या मागच्या चाकाखाली आला. चाकाखाली चिरडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपस्थित नागरिकांनी आणि एसटी प्रशासनाने त्याला तातडीने स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवाशांनी धावत्या बसमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा जीवघेणा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. . . . #Ambajogai #AmbajogaiNews #STBusAccident #BeedNews #MSRTC #BusStandAccident #AccidentNews #MaharashtraNews #AlertNews #SocialAwareness #STBus #अंबाजोगाई #बीड #एसटीबस #अपघात #मराठीबातम्या

Haveli, Pune | Jun 27, 2026

थेऊर-कोलवडी मार्गावर वाहतूक कोंडी ; स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन केली वाहतूक सुरळीत...
.
.
थेऊर (पुणे) : थेऊर-कोलवडी राज्य मार्गावर शानिवारी (ता. 27) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर शाळेजवळ एक मालवाहतूक कंटेनर रस्त्यात बंद पडल्याने ही कोंडी निर्माण झाली.

कंटेनर रस्त्यावर बंद पडल्यामुळे थेऊर गावापासून कोलवडी, उंद्रे वस्तीपर्यंत तब्बल चार ते पाच किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, कामगार तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

दरम्यान, वाहतूक कोंडीची तीव्रता लक्षात घेऊन स्थानिक तरुण शाहिद अक्कलकोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून वाहनांना योग्य दिशा देत वाहतूक नियंत्रित करण्याचे काम केले. स्थानिक तरुणांच्या या सामाजिक योगदानाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
.
.
.
#Theur #TheurNews #PuneTraffic #PuneNews #TrafficJam #Kolwadi #SocialWork #LocalHeroes #PuneLivenews #MaharashtraNews #ViralPune #ChintamaniVidyaMandir #पुणे #थेऊर #वाहतूककोंडी #पुणेन्यूज #मराठीबातम्या

थेऊर-कोलवडी मार्गावर वाहतूक कोंडी ; स्थानिक तरुणांनी पुढाकार घेऊन केली वाहतूक सुरळीत... . . थेऊर (पुणे) : थेऊर-कोलवडी राज्य मार्गावर शानिवारी (ता. 27) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर शाळेजवळ एक मालवाहतूक कंटेनर रस्त्यात बंद पडल्याने ही कोंडी निर्माण झाली. कंटेनर रस्त्यावर बंद पडल्यामुळे थेऊर गावापासून कोलवडी, उंद्रे वस्तीपर्यंत तब्बल चार ते पाच किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीमुळे शालेय विद्यार्थी, कामगार तसेच नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. दरम्यान, वाहतूक कोंडीची तीव्रता लक्षात घेऊन स्थानिक तरुण शाहिद अक्कलकोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून वाहनांना योग्य दिशा देत वाहतूक नियंत्रित करण्याचे काम केले. स्थानिक तरुणांच्या या सामाजिक योगदानाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. . . . #Theur #TheurNews #PuneTraffic #PuneNews #TrafficJam #Kolwadi #SocialWork #LocalHeroes #PuneLivenews #MaharashtraNews #ViralPune #ChintamaniVidyaMandir #पुणे #थेऊर #वाहतूककोंडी #पुणेन्यूज #मराठीबातम्या

Haveli, Pune | Jun 27, 2026

५,९०० रुपयांसाठी अडकला मृतदेह! लावणीसम्राज्ञी विठाबाईंच्या आयुष्याचा अत्यंत दु:खद अंत...
.
.
घुंगरांचा खणखणाट आणि आपल्या आदाकारीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या पहिल्या तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनप्रवास आता 'ईथा' (Eetha) चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाईंची मुख्य भूमिका साकारत आहे.

पण, ज्या विठाबाईंनी प्रेक्षकांना आयुष्यभर भरभरून आनंद दिला, त्यांच्या खऱ्या आयुष्याचा अंत अत्यंत गरिबीत आणि वेदनेत झाला. वयाच्या ७४ व्या वर्षी केईएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले, मात्र रुग्णालयाचे अवघे ५,९०० रुपयांचे बिल भरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला. महाराष्ट्राला सांस्कृतिक समृद्धी देणाऱ्या एका महान लोककलावंताची ही दुरवस्था समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. विठाबाईंचा हाच थरारक, संघर्षमय आणि भावूक प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
.
.
"मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील लोककलावंतांना म्हातारपणी अशी गरिबी का नशिबी येते? सरकारकडून त्यांना योग्य पेन्शन आणि मदत मिळायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!"
.
.
.
#VithabaiNarayangaonkar #EethaMovie #ShraddhaKapoor #LaxmanUtekar #VithabaiEetha #LavaniSamradni #MaharashtraCulture #MarathiCinema #BollywoodNews #TrendingNews #MarathiNews #विठाबाईनारायणगावकर #ईथा #श्रद्धाकपूर #मराठीबातम्या 
.
.
Vithabai Narayangaonkar, Eetha movie trailer, Shraddha Kapoor Eetha, Laxman Utekar upcoming movie, Vithabai Narayangaonkar biography, Tamasha Samradni Vithabai, KEM hospital Vithabai news, Lavani queen Maharashtra, Marathi movie Eetha update, Shraddha Kapoor marathi look, विठाबाई नारायणगावकर, ईथा चित्रपट, श्रद्धा कपूर ईथा, लावणीसम्राज्ञी विठाबाई, मराठी तमाशा इतिहास

५,९०० रुपयांसाठी अडकला मृतदेह! लावणीसम्राज्ञी विठाबाईंच्या आयुष्याचा अत्यंत दु:खद अंत... . . घुंगरांचा खणखणाट आणि आपल्या आदाकारीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या पहिल्या तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांचा जीवनप्रवास आता 'ईथा' (Eetha) चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाईंची मुख्य भूमिका साकारत आहे. पण, ज्या विठाबाईंनी प्रेक्षकांना आयुष्यभर भरभरून आनंद दिला, त्यांच्या खऱ्या आयुष्याचा अंत अत्यंत गरिबीत आणि वेदनेत झाला. वयाच्या ७४ व्या वर्षी केईएम रुग्णालयात त्यांचे निधन झाले, मात्र रुग्णालयाचे अवघे ५,९०० रुपयांचे बिल भरण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला मोठा संघर्ष करावा लागला. महाराष्ट्राला सांस्कृतिक समृद्धी देणाऱ्या एका महान लोककलावंताची ही दुरवस्था समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. विठाबाईंचा हाच थरारक, संघर्षमय आणि भावूक प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. . . "मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील लोककलावंतांना म्हातारपणी अशी गरिबी का नशिबी येते? सरकारकडून त्यांना योग्य पेन्शन आणि मदत मिळायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!" . . . #VithabaiNarayangaonkar #EethaMovie #ShraddhaKapoor #LaxmanUtekar #VithabaiEetha #LavaniSamradni #MaharashtraCulture #MarathiCinema #BollywoodNews #TrendingNews #MarathiNews #विठाबाईनारायणगावकर #ईथा #श्रद्धाकपूर #मराठीबातम्या . . Vithabai Narayangaonkar, Eetha movie trailer, Shraddha Kapoor Eetha, Laxman Utekar upcoming movie, Vithabai Narayangaonkar biography, Tamasha Samradni Vithabai, KEM hospital Vithabai news, Lavani queen Maharashtra, Marathi movie Eetha update, Shraddha Kapoor marathi look, विठाबाई नारायणगावकर, ईथा चित्रपट, श्रद्धा कपूर ईथा, लावणीसम्राज्ञी विठाबाई, मराठी तमाशा इतिहास

Haveli, Pune | Jun 27, 2026