पालघर: तिरुपतीनगर- विरार येथे व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक; गुन्हा दाखल
अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात येते एका व्यापाऱ्याची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी सुमेध खंडारे व विजय जयस्वाल यांनी व्यापारी अल्पेश वेकरीया यांच्याकडून आईस्क्रीमच्या मालाचे 2 लाख 91 हजार रुपये घेतले. मात्र या आरोपींनी या पैशांचा वापर स्वतःसाठी केला व व्यापाऱ्याची फसवणूक केली. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यास आरोपी सुमित खंडारे व विजय जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.