पालघर: विजय कॉलनी, टॅप्स निवासी वसाहत परिसरात करण्यात आले ब्लॅक आउट प्रात्यक्षिक
पालघर जिल्ह्यातील तारापूर बोईसर मार्गावरील विजय कॉलनी टॅक्स निवासी वसाहत परिसरात ब्लॅक आऊट प्रात्यक्षिक करण्यात आले. हवाई हल्ल्याचा संभाव्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सजता निर्माण करण्याचे उद्देशाने हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे यावेळी नागरिकांना प्रथमोपचार, आग विझवण्याचे प्राथमिक उपाय तसेच ब्लॅक आऊट संदर्भातील माहिती दे मार्गदर्शन करण्यात आले.