पालघर: नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा: पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील
सध्या उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यातील लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. कोस्टल चेक पोस्ट च्या ठिकाणी नाकाबंदी सुरवसे सर्व हॉटेल लॉज तपासणीचे काम सध्या पोलिसांमार्फत सुरू आहे. सागर रक्षक दल, नागरिकांच्या विविध स्तरावरील बैठका सुरू आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये मदत व आवश्यकता असल्यास पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.