पालघर: जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 800 एकर क्षेत्रावरील फळबाग व भात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला आहे. यामुळे जिल्ह्यात मोठ्या मोठ्या प्रमाणात फळबाग व तिकांचे नुकसान झाले आहे. आंबा, चिकू, जांभू या फळांसोबत भाजीपाला व उन्हाळी भात लागवडीचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 800 हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.