पालघर: दाभोण परिसरात वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू
पालघर जिल्ह्यातील दाभोवन परिसरात अंगावर वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काशीराम धांगडा आणि बाबल्या दौडा यांनी त्यांचे बैल करण्यासाठी नेहमीप्रमाणे सोडले होते. यावेळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यांच्या बैलांनी एका झाडाखाली आसरा घेतला, मात्र याचवेळी झाडावर व बैलांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत दोनही बैलांचा मृत्यू झाला आहे असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.