पालघर: चिल्हारफाटा परिसरात बलकर ट्रकच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू; दोन जण जखमी
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चिल्हारफाटा उड्डाणपुलाखाली फुटपाथ व दुभाजक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या आदिवासी महिलेला बलकर ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगातील ट्रकने भाजीविक्री करणाऱ्या महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला आहे भारती भुयाळ असे मृत महिलेचे नाव आहे. रमेश खुलात आणि अनुसुया खरपडे हे दोघेजण अपघातात जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात ट्रक चालक जयप्रकाश महतो याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.