महाड: रायगडातील पोल्ट्री व्यवसायावर अवकळा
Mahad, Raigad | May 5, 2026 कोरोना नंतर आरोग्याच्या बाबतीत सजग झालेल्या मनुष्यप्राणी तसेच त्याची बदलती जीवनशैली यामुळे पोल्ट्री व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. कोंबडयाच्या विष्ठेमुळे दुर्गंधी पसरणे, नागरी आरोग्याची समस्या निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील पोल्ट्री उत्पादन व्यवसाय कमी होऊ लागले आहेत. नागरिकीकरणामुळे पनवेल, उरण भागातील पोल्ट्री व्यवसाय कमी झाल्याचे बोलले जात आहे.