उरण: उरणमध्ये किरकोळ वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या
Uran, Raigad | May 19, 2026 उरण तालुक्यातील जांभूळपाडा येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून शंकर लक्ष्मण कातकरी (वय 20) या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात फिर्यादी अजय कातकरी (वय 24) यांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ऋतीक राजेंद्र जाधव (वय 25) याने दोघांना आपल्या घरी बोलवून घेतले.