बदनापूर: भाजपा महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार सुहास सिरसाठ विजयी होणार-आ.नारायण कुचे तहसील कार्यालय येथे व्यक्त केला विश्वास
Badnapur, Jalna | Jun 18, 2026 आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी भाजपा महायुती छत्रपती संभाजी नगर जालना क्षेत्राचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार सुहास सिरसाठ हे विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे कारण देशात नरेंद्रभाई मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास आहे आणि या विश्वासावरच नक्कीच विजय मिळणार,असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.