उरण: तारण ठेवलेले 55 लाखांचे सोने लुबाडले
Uran, Raigad | May 22, 2026 सोने तारण ठेवून घेतलेले लाखो रुपयांचे दागिने परत न करता तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारक उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारुती ज्वेलर्सचे मालक नथुसिंग चंदना, त्यांचे वडील भेरूनाथ चंदना आणि त्यांचे व्यावसायिक मित्र निलेश मेहता यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. उरणमधील गणेश नगर भागात राहणारे आणि आयुश कंस्ट्रक्शन नावाने सिव्हील कामे करणारे व्यावसायिक युवराज प्रताप पाटील (वय 42) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.