महाड: रायगडात होणार डिजिटल जनगणना
Mahad, Raigad | Apr 17, 2026 देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय उपक्रमांपैकी एक असलेल्या जनगणनेची प्रक्रिया आता वेग घेऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यात या डिजिटल जनगणनेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. देशाच्या इतिहासातील ही 16 वी आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना असून, यावेळी पहिल्यांदाच मोबाईल अँपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने माहिती संकलन केले जाणार आहे.