उरण: तिसऱ्या मुंबईच्या सर्व्हेसाठी आलेले पथक रिकाम्या हाती परत
Uran, Raigad | Jun 8, 2026 तिसऱ्या मुंबई प्रकल्पाविरोधात रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असतानाच, सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या रविवारी या प्रकल्पाविरोधात माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, नेमक्या याच पार्श्वभूमीवर सकाळी चिरनेर गावात तिसऱ्या मुंबईसाठी जमिनीच्या सर्वेक्षणाकरिता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक दाखल झाले.