नागपूर शहर: धक्कादायक! नागपुरात आमदार निवास चौकात टावरवर चढून तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; सुटकेचे प्रयत्न सुरू
उपराजधानी नागपूर मधून सध्याच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे .नागपूरमधील आमदार निवास जवळील चौकात आज दुपारी एका तरुणाने अचानक उंच टावरवर चढला ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे रस्त्यावरील नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाला आला आहे.तो नेमका कोणत्या उद्देशाने टावरवर गेला आणि काय बोलत आहे, हे उंची जास्त असल्यामुळे खाली असलेल्या लोकांना स्पष्टपणे ऐकू येत नाहीये.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि नागपूर पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.